Saturday, December 25, 2010

सहनशीलता

  ही म्हणजे अशी एक गोष्ट आहे जी विकत आणता येत नाही किवा हवे तेव्हा कॉपी नाही करता येत. ती तुमच्या आमच्या मध्ये पेरावी लागते नही तर रक्ततात असली पाहिजे. तसा हा माझा आवडीचा विषय म्हणू शकतो आणि मला ती एक मोठी ठेव  म्हणून भेटली आहे माझ्या वडिलान कडून.
  आपण आयुषभर कुठल्या न्या कुठल्या गोष्टी मागे धावत असतो आणि जोवर ती मिळत नाही तोवर समाधानी नाही होत. कोणत्या गोष्ठी मागे किती वेळ आणि कश्या रीतीने पळाचे हा निर्णय घेता घेता आयुष वळणदार बनत जाते. यात आपण सगळ्यात मोठी investment म्हणून करू शकतो ती म्हणजे वेळ आणि ती करतो ही.
   एखादा निर्णय झटपट घेण्यासारखा असतो आणि एखादया वेळी आपण पण सांगू नाही शकत किती वेळ लागेल ते. तिथेच मग याची गरज भासते. सगळ्यात ती थोडी तरी असतेच. जसा जसा वापर आपण करू तसा तसा त्यात भर पडत जाईल. ती शिकवता येत नाही, वापरात आणावी लागते.
  पेरला कि लगेच उगत नाही, त्याला जेवडा वेळ लागाचा तेवडा वेळ लागणारच. प्रत्येक प्रशनाचे लगेच उत्तर मिळालाच हवे असा होणार नाही आणि  भेटलच तर उत्तम कारण ती कडेला तर लागेल आणि मग पुढचा निर्णय घेण्यास आपण मोकळे. पण हे प्रक्टीकॅल्ली जरा कठीणच आहे. साहजिक आहे कि जर मनासारखे हवे असेल तसा घडत नाही किवा निर्णय घेता येत नाही तर negative वादळ निर्माण होवू शकत. जर तुमच्यात पूरक सहनशीलता असेल तर ती तुम्हाला धरून ठेवेल आणि त्या योग्य वेळ येई पर्यंत टिकण्यात मदत करेल. फक्त येवडाच कि जमेल तितका शेवट गोड करता यायीला हवा.